ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन च्या काळात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोन नंतर आता रेड झोनमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामध्ये मद्यविक्री ला परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव भूषण गगरणी यांनी दिली.
केंद्र सरकारने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता वाईन शॉप ना परवानगी देण्यात आली आहे. पण येथील नियम अजून कडक करण्यात आले आहेत.
रेड झोनमध्ये दुकाने उघडताना एका लेन मधील केवळ पाचच दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तसेच अत्यावश्यक दुकानांनाच हा नियम असेल. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर कोणतेही बंधन असणार नाही.
ऑरेंज, ग्रीन बरोबर रेड झोनमध्ये ही दारूची दुकाने सुरू केली जातील. मात्र, मॉल, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये दारू मिळणार नाही. तसेच ग्राहकांना सहा फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच एका दुकानात पाच पेक्षा अधिक ग्राहकांना परवानगी नसणार आहे. मात्र स्पा, सलून याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.









