ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 127 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 24 हजार 150 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 251 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 24,150 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2643 पोलीस अधिकारी आणि 21,507 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 21 हजार 179 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2296 पोलीस अधिकारी आणि 18,883 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2720 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 322 पोलीस अधिकारी आणि 2390 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 251 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 पोलीस ऑफिसर आणि 226 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.








