ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात असला तरी काल पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असून मृत्यूही वाढले आहेत.तर बरे होणाऱया रुग्णांची संख्याही कालच्या तुलनेत कमीच आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात 119 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या 105 इतकी होती. कालच्या दिवशी 6 हजार 795 रुग्ण बरे झाले होते. तर, 4 हजार 355 इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. सोमवारी ही संख्या 3 हजार 653 इतकी होती.
काल राज्यात झालेल्या 105 रुग्णांच्या मृत्यूनंतरही राज्याचा मृत्यूदर मात्र 2.11 टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 43 हजार 034 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के इतके झाले आहे.
- पुणे जिह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 49 हजार 752 वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिह्यात हा आकडा 11 हजार 962 वर खाली आला आहे. ठाणे जिह्यात 6 हजार 971 सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱयात ही संख्या 5 हजार 472 इतकी आहे. तर, सांगलीत एकूण 4 हजार 397 इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण 4 हजार 601 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात 4 हजार 138 इतके रुग्ण आहेत.








