ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गुरुवारी 1408 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले. राज्यात आतापर्यंत 11 हजार 726 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यात मागील 24 तासात 2345 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 41 हजारांपार गेली आहे. राज्यात आतापर्यंत 41 हजार 642 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी राज्यात 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत 41, नवी मुंबई 2, पुणे 7, मालेगाव 9, औरंगाबाद 3, पिंपरी-चिंचवड आणि सोलापुरात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये 36 पुरुष आणि 28 महिला रुग्ण आहेत. सध्या राज्यात 28 हजार 454 रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 लाख 19 हजार 710 नमुन्यांपैकी 2 लाख 78 हजार 068 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 41 हजार 642 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 37 हजार 304 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 26 हजार 865 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.