ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. असे असले तरी दुसरीकडे पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक फंगस’ या आजाराने राज्यात अक्षरशः थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.
- सध्या 2,900 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत ‘ब्लॅक फंगस’ चे 9 हजार 268 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 1,112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 2,900 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात नागपूरमध्ये ‘ब्लॅक फंगस’ रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. सद्य स्थितीत नागपूरमध्ये 1521 रुग्ण आहेत. यातील 497 रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर 858 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत नागपूर मधील 152 जणांनी आपला जीव गमावला आहे.

पुण्यात ‘ब्लॅक फंगस’ रुग्णांचा आकडा 1241 इतका आहे. औरंगाबादमध्ये 1,043, नाशिक 659 तर सोलापूरमध्ये हा आकडा 589 इतका आहे.









