ऑनलाईन टीन / मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराट्रात काहीसं ढगाळ वातावरण दिसत असले तरी पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या भागांना या पावसाचा जोरदार तडाखा बसेल अशी शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसात पश्चिम बंगाल परिसरातील कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे २१ ते २३ सप्टेंबर राज्यातील बहूतांशी भागात पावसाची तीव्रता वाढणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी २५ सप्टेंबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा नवीन सिस्टिम निर्माण होण्याची शक्यता माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच भारतीय हवामान विभाग पुणेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे ही स्पष्ट केले आहे.








