ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 6875 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 30 हजार 599 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी एका दिवसात 4067 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत राज्यात 93, 652 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासात राज्यात 219 मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 9 हजार 667 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.19 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 4.19 इतके आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत प्रयोगशळेत पाठवण्यात आलेल्या 12 लाख 22 हजार 487 नमुन्यांपैकी 2 लाख 30 हजार 599 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 49 हजार 263 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 48 हजार 191 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.









