ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊन काळात पोलीस यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात आज दाखल करण्यात आल्या. यामध्ये 5 रॅपिड ॲक्शन फोर्स, सीआयएसएफच्या 3 आणि सी आर पी एफच्या 2 तुकड्यांचा समावेश आहे. आजच या तुकड्या राज्यातील विविध ठिकाणी रुजू होतील.
रमजान ईद, पालखी सोहळा आणि गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलिसांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे 20 तुकड्यांची मागणी केली होती. मात्र, केंद्राने सध्या 10 तुकड्या तुकड्या पाठवल्या आहेत. या एका तुकडीत 100 जवान आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या तुकड्या नेमक्या कोणत्या ठिकाणी तैनात करायच्या याचा अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.









