ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या 522 रुग्णांचे निदान करण्यात आले असून आत्तापर्यंत 1282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या 8 हजार 590 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट द्वारे दिली.
ते म्हणाले, काल 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले आले. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 369 वर पोहचली आहे. काल मृत पावलेल्या 27 रुग्णांपैकी 15 जण मुंबईचे, अमरावती मधील 6 जण, पुण्यातील 4, तर जळगावातील दोन, सोलापूर आणि लातूर मधील एक – एक जण आहेत.
राज्यात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या एक लाख 21 हजार 562 नमुन्यांपैकी 1 लाख 12 हजार 52 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर 8590 जन पॉझिटिव्ह आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात एकूण 1 लाख 45 हजार 677 लोक होम क्वारंटाईन असून 9 हजार 399 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
– एकट्या मुंबई 5 हजार 776 कोरोनाग्रस्त
काल एका दिवसात एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे 395 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण संख्या 5 हजार 776 वर पोहचली आहे. तर गेल्या चोवीस तासात 15 जणांनी आपला जीव गमावला आहे त्यामुळे मुंबईतील मृतांची एकूण संख्या 219 वर पोहचली आहे.









