हुबळी/प्रतिनिधी
केरळ येथून कर्नाटकात येणाया प्रवाशांना कोरोना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र सादर करायला हवे, असे राज्य सरकारच्या आदेशानुसार, तज्ञांनी सांगितले आहे. तसेच सरकारने महाराष्ट्र येथून येणाऱ्या लोकांना हा आदेश काढावा असेही म्हंटले आहे.
केरळ आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोविड प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि ही वाढ थांबवण्यासाठी महाराष्ट्राने गुरुवारी नवीन निर्बंध आणले आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्री करत होते.
कर्नाटकची सीमा महाराष्ट्राशी आहे, तज्ज्ञांना भीती आहे की प्रवाश्यांमुळे संक्रमण पसरू शकेल, विशेषत: उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये. नकारात्मक प्रमाणपत्रांचा आग्रह धरल्यास ही भीती कमी होईल, असे ते म्हणाले.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांचे योग्य प्रकारे निरीक्षण केले गेले नाही तर चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट आणि विजापूर येथे घटनांमध्ये वाढ होऊ शकते.