जिह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गेला 307 वर
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्रातून आलेल्या आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली असून जिह्याचा आकडा आता 307 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातून आलेल्या 21 वषीय महिलेला तसेच 52 वषीय इसमाला आणि 6 वषीय बालकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी जिल्हा हेल्थ बुलेटीनमधून देण्यात आला आहे. यामुळे परराज्यातून येणाऱयांना कोरोनाची अधिक लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी कडोली, एकसंबा, कागवाड येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मंगळवारी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याचबरोबर 9 जण कोरोनामुक्तही झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनामुक्त होणाऱयांचा अकडाही वाढत चालला असून परराज्यातून येणाऱयांनाच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत असल्यामुळे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊननंतर आकडेवारी पुन्हा वाढतच चालली आहे. मंगळवारी राज्यात 317 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्याचा आकडा 7 हजार 530 वर पोहोचला आहे.
जिह्यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. हुक्केरी तालुक्मयातील 5 जणांचा समावेश तर बेळगाव तालुक्मयातील 4 जण कोरोनामुक्त झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. रुग्ण क्रमांक 5410, 4511, 5412, 5419, 5497, 5393, 5394, 5399, 9390 हे बरे झाले आहेत. बरे होण्याची संख्या वाढली असली तरी परराज्यातून येणाऱयांना कोरोनाची बाधा अधिक होत आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱया व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये ठेवणेच गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.
या सर्वांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामध्ये या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत 256 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 52 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.









