नाशिक : प्रतिनिधी :
केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
होळकर म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी त्रस्त झाले असून केवळ उद्योगपती धार्जीणे धोरण राबवत आहे. केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला या मोठ्या उद्योगपतीच्या तालावर नाचविण्यासाठीच हे कायदे आणले असून देशभरातील शेतकरी संतप्त झाला आहे. त्यामुळेच केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत.