ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4 हजार 505 नवीन कोरोनाबाधित आढळले आले. यासोबतच 7 हजार 568 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 68 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 51 हजार 956 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.76 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,97,25,694 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,57,833 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,21,683 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,895 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 74 हजार 995 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.








