मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये तब्बल तासभर या दोन्ही त्यांमध्ये खलबतं झाली. या भेटीत नेमकी कोणत्या बाबींवर चर्चा झाली, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सहकार क्षेत्राविषयी ही भेट झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत विशेष करून सहकारी बँकांसदर्भात जे कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत, त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. असं जरी सांगितलं असलं, तरी त्यावर राजकीय विश्लेषक आणि इतरांचा विश्वास बसलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोदी-पवार यांच्या भेटीवर टीकास्त्र सोडलं आहे. दमानिया यांनी या भेटीवर “महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”.असा खोचक टोला लगावला आहे.
अंजली दमानिया म्हणतात…
फडणवीस-भुजबळ, मोदी-पवार यांच्या भेटीवर अंजली दमानिया आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “१५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”. असं म्हणतील आहे.








