ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे. काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. तसेच लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. सध्या माझी तब्येत उत्तम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सद्य स्थितीत कोरोना बाधितांची संख्या 11 लाख 45 हजार 840 वर पोहचली असून आता पर्यंत 31 हजार 351 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे, त्यामुळे राज्यात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.








