ऑनलाईन टीम / मुंबई :
कंगना रानौतशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हे लक्षात ठेवावे, महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना दिला.
पुढे ते म्हणाले, या प्रकरणात भाजपने आपली भूमिका आणखी आक्रमकतेने मांडवी. कंगना संदर्भात गृहमंत्र्यांनी मांडलेली भूमिकाच सरकारची भूमिका असून सर्व पक्षांनी मुंबईसाठी एकत्र यायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
कंगनाने स्वतःचं ट्विटर हँडल स्वतः वापरावे. राजकीय पक्षांना ट्विटर हँडल हाताळायला देऊ नये, असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला.
अमृता फडणवीस यांच्या ट्विट बाबत बोलण्यास मात्र संजय राऊत यांनी यावेळी नकार दिला.