ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची पुन्हा वेगाने वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनत आहे. दिवसें – दिवस आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब दिसून येत आहे. शिवाय ओमिक्रॉनचे रूग्ण देखील वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार आज मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले असून राज्यशासनाने कोरोना संदर्भात अजून ही सक्रीयता दर्शवणे आवश्यक आहे. असा ही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना पवार यांनी मुंबईबरोबर राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून बिघडत चाललेल्या परिस्थितीवर केंद्राचीही नजर असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, राज्यातील सध्याचं काम हे संथगतीने सुरु आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी आपल्या कामाची गती वाढवावी. महाराष्ट्रात आठवड्याभरात कोरोनाची संख्या वाढली आहे. केंद्राने सर्व राज्यांना नियमावली दिली आहे. मुंबईत वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून वेळीच पावलं उचलली गेली पाहिजेत. कोरोना लशीचा पुरेसा पुरवठा देखील केंद्राने केला आहे. त्यामूळे केंद्रीय मंत्री पवार यांनी राज्य सरकारवरच्या कारभारावर बोट ठेवले आहे. यावर राज्य शासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








