ऑनलाईन टीम / लंडन :
पंजाबमधील महारानी जिंदन कौर यांच्या रत्नजडित दागिन्यांचा लंडनमध्ये लिलाव करण्यात आला. या दागिन्यांना लिलावात 60 लाख रुपये दर मिळाला.
शीख समाजाचे महाराजा रणजित सिंग यांच्या जिंदन या पत्नी होत्या. जिंदन यांची नातं राजकुमारी बम्बा सदरलैंड हिला वारसा हक्काने मिळाला होता. बोनैहम्स इस्लामिक इंडियन आर्ट सेल्समध्ये या दागिन्याला 62,500 पाउंड म्हणजेच जवळपास 60 लाख रुपये मिळाले. या लिलावात 19 व्या शतकातील इतर अनेक मौल्यवान कलाकृती आणि दागिन्यांचाही समावेश आहे.
जिंदन कौर ही महाराजा रणजितसिंह यांची एकमेव जिवंत पत्नी होती. पंजाबमधील ब्रिटिशांच्या व्यवसायाला त्यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, शेवटी त्यांना शरणागतीही पत्करावी लागली. त्यानंतर लाहोरमधील महाराजांच्या खजिन्यातून 600 हून अधिक दागिने जप्त करण्यात आले. 1848 साली नेपाळला पळून जाण्यापूर्वी या राणीला तुरुंगात डांबण्यात आले होते.









