खासदार उदयनराजे यांनी दिली ग्वाही, जीर्णोद्धाराच्या कामास दिली भेट
प्रतिनिधी / सातारा
छत्रपती शाहु महाराजांची समाधी संगममाहुली येथे चांगली बांधली अन् लोकार्पण झाला. लोकांमध्ये भावना आहे. असे दिसून येते की अजून सुद्धा भारतात भारतीय संस्कृती जीवंत आहे. कारण आपल्या भुतकाळाचा आधार घेवून जगत असतो. माझ्या परिने जी काय मदत लागेल ती या उपक्रमाला करणार, अशी ग्वाही खासदार उदयनराजे यांनी दिली.
संगममाहुली येथे महाराणी ताराराणी व येसुबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. त्या कामाच्या ठिकाणी पाहणी केली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, संतोषभाऊ जाधव, ऍड. पवार, गणेश कदम यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, आज लोकसेवेतून अनेक तरुण एकत्र येवून महाराणी येसूबाई व ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णोध्दार करत आहेत. हा उपक्रम स्तुत्य असा करत आहेत. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. आपण भविष्यातली वाटचाल करत असताना इतिहासाची जोड देत असतो. आपण जर आपला इतिहास पाहिला तर आपली ओळख होते. आज जे दाखले दिले जातात. आपल्या देशात असेल परदेशात असेल. |
त्यावरुन आपल्या पूर्वजांची महती समजते. आर्केलॉजी डिपॉटमेंटकडे पाठपुरावा करणार आहे. ज्याप्रमाणी मोहजांदडो, हडप्पा येथे उत्खनन केल्यावर संस्कृती आढळून आली. तशीच येथेही संस्कृती आढळून येईल. शाहु महाराजांची समाधी चांगली बांधण्यात आली. लोकार्पण करण्यात आले. तरुणांच्या भावना लक्षात घेता भारतीय संस्कृती आहे. या कामासाठी सर्वतोपरी मी सहकार्य करीन, अशी ग्वाही खासदार उदयनराजे यांनी दिली.
औरंगाबादचे संभाजीनगर व्हायला हवे
औरंगाबादच्या नामांतराबाबत पत्रकारांनी छेडले असता छत्रपती संभाजी महाराज आमचे पुर्वज होते. त्यांच्या बद्दल आदर तर आहेच. एकंदरीत आपण इतिहास जर वाचला तर जे लोक होवून गेले त्यांचा इतिहास वाचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील. तर त्यांची कर्तबगारी म्हणून त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय म्हणून ते थोर पुरुष आहेत. औरंगाबाद नाव असेल ते बदलायला पाहिजे.. अनेक ठिकाणी आपण पहातो. बॉम्बे च मुंबई झालं. अनेक नाव बदलली. लोकशाहीमध्ये लोक निर्णय घेतील. नाव बदलले पाहिजे, असे खासदार उदयनराजे यांनी सांगितले.









