प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवार दि. 19 रोजी म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला आहे. शनिवारी चांगळेश्वरी मंदिर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीलच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी हे होते.
कर्नाटक सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व्हॅक्सिन डोपो येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये येळ्ळूरवासिय स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये प्रकाश अष्टेकर, कार्याध्यक्ष दु•ाप्पा बागेवाडी, राजू पावले, विलास घाडी यांनी आपले विचार व्यक्त केले. या बैठकीला ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, प्रकाश विष्णू पाटील, परशराम घाडी, अनंत पाटील, कृष्णा शहापूरकर, यल्लाप्पा बिर्जे, परशराम परीट, शिवाजी देसाई, ग्रा. पं. सदस्य जोतिबा चौगुले, सतीश देवूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









