प्रतिनिधी/ सातारा
जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून उशिरा हॉटेल, ढाबे सुरू ठेवण्यास कारवाईचे आदेश दिले होते. तरीही म्हसवे येथील हॉटेल मलबार, लिंब फाटा येथील ढाबा शेरे पंजाब आणि शेंदे हद्दीतील हॉटेल समरथल या तीन हॉटेलच्या मालकांवर सातारा तालुका पोलीसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या हॉटेल मालकांवर ठोस कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला उशीरा हॉटेल बंद ठेवण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरीही महामार्गालगतच्या हॉटेल व्यवसायिकांनी हा नियम मोडून काढला. असे अनेक हॉटेल व्यवसायिक आहेत. जे रात्री उशीरापर्यंत हॉटेल सूरू ठेवतात. यामुळे खवय्यांची गर्दी वाढलेली असते. यांचा नाहक त्रास आसपासच्या लोकांना होत असतो. या हॉटेल व्यवसायिकांवर ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांतून होत असते. यावर मार्ग काढण्यासाठी नियम आणखी कडक केले पाहिजेत. तर हे हॉटेल चालकांना कोरोनाचे गांभीर्य कळणार आहे.








