जागतिक बँकेच्या अहवालाचा निष्कर्ष : जागतिक विकास दर 4 टक्के राहण्याचा अनुमान : ठोस पावलांची गरज
जागतिक बँकेने चालू वर्षासाठी जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी स्वतःचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 4 टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जागतिक बँकेचा हा अहवाल ग्लोबल इकॉनॉमिक प्रोस्पेक्ट या नावाने सादर करण्यात आला आहे. जागतिक बँकेने वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यांबद्दल इशाराही दिला आहे. महामारी पाहता अर्थव्यवस्थेत सुधारणांकरता धोरणनिर्मात्यांना ठोस पावले उचलावी लागतील. महामारी लवकर संपुष्टात न आल्यास याचा प्रभाव यंदा तसेच पुढील वर्षांपर्यंतही राहू शकतो आणि जागतिक विकासदर मंदावू शकतो असे अहवालात म्हटले गेले आहे.
जागतिक बँकेचा अनुमान
2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत 4.3 टक्क्यांची घट झाली झाली, परंतु आता अर्थव्यवस्था पुन्हा वृद्धीच्या दिशेने अग्रेसर आहे. कोविड- 19 महामारीमुळे लाखो लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. तसेच गरीब लोक अधिकच गरीब झाले आहेत. रोजगार पूर्वीच्या तुलनेत कमी झाले असून बेरोजगारीतही वाढ दिसून आली आहे. जागतिक आर्थिक घडामोडींवरील हा प्रभाव आगामी काळातही राहू शकतो अशी शंका जागतिक बँकेने व्यक्त केली आहे.
जलद काम करावे लागणार
कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशांना वेगाने काम करावे लागणा आहे. तसेच लस लोकांपर्यंत पोहोचविण्याकरता तत्परता दाखवावी लागेल. आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्याकरता देशांना पुनर्गुंतवणूक प्रक्रियेला चालना द्यावी लागणार आहे. याचबरोबर शासकीय कर्जावरील अवलंबित्व कमी करावे लागणार असल्याचे जागतिक बँकेच्या तज्ञांनी म्हटले आहे.
अनुकूल वातावरणनिर्मिती
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मैलपास यांच्यानुसार अर्थव्यवस्थांमध्ये सौम्य सुधारणांदरम्यान धोरणनिर्मात्यांना कर्जव्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, केंद्रीय बँकिंग आणि मूलभूत सुधारणा आणि अर्थसंकल्प धोरणात अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे. तसेच मनुष्यबळ आणि निर्मितीक्षेत्राला अधिक लवचिक करण्यात यावे. याचबरोबर पारदर्शकता आणि शासनप्रणालीला बळ दिले जावे. महामारीमुळे जगातील उदयोन्मुख आर्थिक शक्ती प्रभावित झाल्या आहेत. विकसनशील अर्थव्यवस्थांवर कोरोनाचा मोठा प्रभाव दिसून आल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
अमेरिका, जपान, चीन
अहवालानुसार महामारीमुळे अमेरिकेचा विकास दर चालू वर्षात 3 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अनुमान आहे. 2020 मध्ये जीडीपी 3.6 टक्क्यांनी कमी झाला होता. युरोपीय देशांमध्ये हा विकास दर 3 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. तर जपानमध्ये विकासदर 2.5 टक्के राहू शकतो. चीनच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 8 टक्के वृद्धीचा अनुमान
आहे.
गरीब देशांवर प्रभाव अधिक
जागतिक अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीचा सर्वात मोठा प्रभाव आणि गरीब आणि दुर्बल लोकांवर दिसून आला आहे. याचा प्रभाव अधिक व्यापक राहिलेल्या देशांमध्ये अधिक काम करण्याची गरज असल्याचे उद्गार बँकेचे मुख्य अर्थतज्ञ कारमॅन राइनहार्ट यांनी काढले आहेत. संक्रमणाचा दर कमी न झाल्यास जागतिक विकास दर 1.6 टक्क्यांपर्यंत राहणार आहे. परंतु यावर नियंत्रण मिळविल्यास तो 5 टक्क्यांपर्यंतही जाऊ शकतो, असे अहवालात नमूद आहे.









