जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचे आश्वासक विधान
कोरोना विषाणूवरील लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम समोर येण्याचा अर्थ जग ‘महामारी’ संपुष्टात आणण्यासंबंधी कल्पना करु शकते, असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेने काढले आहेत. श्रीमंत आणि शक्तिशाली देशांनी कोरोनावरील लसीच्या शर्यतीत गरीब आणि दुर्बल देशांना चिरडू नये असेही डब्ल्यूएचओकडून म्हटले गेले आहे.
विषाणूला रोखले जाऊ शकते, परंतु अद्याप मार्ग जोखिमयुक्त आहे. कोरोना विषाणू महामारीने मानवतेला त्याची सर्वात चांगली आणि वाईट गोष्ट दाखवून दिल्याचे डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधनोम यांनी नमूद केले आहे. त्यांचा इशारा त्याग आणि बलिदान, विज्ञान तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रचंड यश तसेच स्वहित, परस्परांवर आरोप लावणे आणि मतभेदांच्या दिशेने होता.
गरीबी, उपासमार, विषमतेशी लढा
कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि संक्रमणाच्या दिशेने इशारा करत टेड्रोस यांनी कुठल्याही देशाचे नाव न घेता या सर्वांदरम्यान विषाणू कायम असून फैलावत असल्याचे म्हटले आहे. लस अतिसंवेदनशीलतेला कमी करणार नाही. महामारी संपुष्टात आल्यावर आम्हाला गरीबी, उपासमार, विषमता आणि हवामान बदल यासारख्या मुद्दय़ांना सामोरे जावे लागणार आहे. भुयाराच्या दुसऱया टोकाला प्रकाशाचा किरण वेगाने बाहेर पडत आहे, परंतु कोरोनावरील लस निश्चितपणे जागतिक जनतेच्या हितासाठी समान स्वरुपात उपलब्ध करावी लागणार आहे. अन्यथा यातून असमानता वाढेल आणि लोक मागे पडण्याचे हे आणखी एक कारण ठरणार असल्याचे टेड्रोस म्हणाले.









