सांगली/प्रतिनिधी
विविध महामंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या कर्जाचा कर्ज माफी करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार, (दि10) रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रिपाइंचे सांगली जिल्हा सरचिटणिस अरूण आठवले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली
राज्यातील महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास चर्मकार, वंसतराव नाईक, महामंडळ व खादी ग्राम उद्योग महामंडळाकडून राज्यभरातील तरूणानी कर्ज घेतले आहे. प्रत्यक्षात राज्यात पडलेला भयावह दुष्काळ, महापूर, नैसगिक आपती यामुळे तरूणानी उभारलेले व्यवसाय संकटात आले आहेत. सात बारा घरचा उतारा जोडून या तरूणांनी विविध महामंडळाकडून ही कर्ज घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीने महामंडळाची कर्जे माफ करावीत अशी रिपाइंची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी राज्यभरात शुक्रवार, (दि10) रोजी एक दिवशी धरणे आंदोलन करणार असल्याचे रिपाइं प्रदेशसचिव विवेक कांबळे यानी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कांबळे, अशोक कांबळे, अरूण आठवले, संदेश भंडारे, सुरेश दुधगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच तहसिलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सरचिटणिस अरूण आठवले यांनी केले.








