महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून सात किमी अंतरावर असलेल्या क्षेत्रमहाबळेश्वर येथील एका युवकाने पडवीला असलेल्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अरुण सखाराम जाधव (वय २३ रा. क्षेत्रमहाबळेश्वर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेची खबर त्याचा भाऊ किरण सखाराम जाधव रा. क्षेत्रमहाबळेश्वर याने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दिली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतचा अधिक तपास पोलिस हवालदार एम. पी. मुळे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









