प्रतिनिधी / महाबळेश्वर
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे, अशी माहीती प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. या वेळी तहसिलदार सुषमा चैधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर उपस्थित होते.
सातारा जिल्हाधिकरी शेखर सिंह यांनी लॉकडाउनच्या नियमात शिथीलता जाहीर केली आहे. या नुसार शनिवार सकाळपासून महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. लॉकडाउनचे नियमात कशा प्रकारे शिथीलता देण्यात आली याची माहीती देण्यासाठी आज हिरडा विश्रामगृहावर प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महाबळेश्वर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत प्रांताधिकारी यांनी अनलाॅक बाबत सविस्तर माहीती दिली. येथे येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाची टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना टेस्टचे अहवाल बरोबर घेवून येणाऱ्या पर्यटकांची पाचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशाच पर्यटकांना पाचगणी व महाबळेश्वर येथे प्रवेश देण्यात येणार आहे. बाजार पेठेतील दुकानदारांची कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. व्यापारी व हॉटेल मधील कामगार यांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना बाबतचे सर्व नियम हाॅटेल व्यवसायिक व व्यापारी यांना बंधनकारक करण्यात आले आहेत.
Previous Article‘अपेक्स’चा डॉ. महेश जाधव याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next Article सातारा जिल्हय़ातील बंधने शिथिल, विकेंड लॉकडाऊन कायम









