कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु, 81 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
सातारा/प्रतिनिधी
रात्री उशिरा सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर येथील 30 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे खाजगी हॉस्पिटलने कळविले आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे आज सकाळी शिरवळ ता. खंडाळा येथील 72 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून तिला श्वसन संस्थेचा त्रास होत होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
81 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 81 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 704 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 448 रुग्ण बरे झाले आहेत. तर 223 रुग्णांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.