ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याच्या बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. त्यातच राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये तर पारा 9 अंशांवर पोहचलाय. शुक्रवारी पहाटे महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव आणि लिंगमळा भागामध्ये तापमान 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे. पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याने या काळात थंडीचा कडाका कायम राहील. त्यानंतर मात्र किमान तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी महाबळेश्वरमध्ये दिवसाचे तापमान सर्वात कमी १९ अंश सेल्सिअस होते.
दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा चांगलाच कमी झाला आहे.आज पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातला तापमानाचा पारा शून्य अंशाच्या जवळ गेलेला पहायला मिळालायामुळे महाबळेश्वरात दवबिंदू गोठतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे