मेक्सिकोतील अजब परंपरेचे झाले पालन
विवाह करणारा प्रत्येक पुरुष आणि महिला स्वतःच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत घर वसविण्याचे स्वप्न पाहतात. परंतु एक जोडीदार माणसाऐवजी मगर असल्यास हे स्वप्न कसे पूर्ण होणार? ही काही दंतकथा नसून वस्तुस्थिती आहे. मेक्सिकोच्या एका गावात तेथील महापौराने एखाद्या महिलेऐवजी मगरीशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करण्यात आल्यावर लोक याला अजब घटना ठरवत आहेत. परंतु प्रत्यक्षात महापौर एका प्राचीन परंपरेचे पालन करत आहे.

सॅन पेड्रो हुआमेलुलाचे महापौर व्हिक्टर ह्युगो सोसा यांनी अलिकडेच एका भव्य पारंपरिक सोहळय़ात स्वतःच्या मगर वधूशी विवाह केला. या अनोख्या विवाहाच्या छायाचित्रांनी सोशल मीडिया युजर्सना थक्क करून सोडले आहे. विवाहात मगर पांढरा गाउन आणि घुंघटमध्ये दिसून आली. सोसा स्वतःच्या वधूला स्वतःच्या हातांमध्ये पकडून होते. स्थानिक लोकांसोबत गावांमधून बाहेर पडत होते. यादम्यान ग्रामीण लोकांनी पारपंरिक वाद्यं वाजविली आहेत.
सर्वात हैराण करणाऱया दृश्यात महापौर स्वतःच्या नव्या वधूला किस करताना दिसून आले. पंरतु कुठल्याही अप्रिय घटनेपासून वाचण्यासाठी मगरीचे तोंड चांगल्याप्रकारे बांधण्यात आले होते. हा विवाह अनेक लोकांना भीतीदायक वाटला आणि तो पाहून ते अस्वस्थ झाले. या मगरीला ‘लिटिल प्रिन्सेस’ म्हटले गेले. या प्राण्याला ‘भूमातेची प्रतिनिधी मानले जाते’. स्थानिक नेत्याशी हिचा विवाह ईश्वरासोबत माणसांच्या संलग्नेतेचे प्रतीक आहे.
परंपरांचे पालन करणारे गाव
आम्ही निसर्गाकसून पुरेसा पाऊस आणि अन्न मागतो असे महापौरांनी म्हटले आहे. सोसा ओक्साकाच्या च्या प्रशांत किनाऱयावरील मच्छिमारांच्या एका छोटय़ाशा गावाचे महापौर आहेत. मेक्सिकोयच दक्षिणेत असलेले ओक्साका स्वतःची संस्कृती, भाषा आणि परंपरांच्या संरक्षणासाठी ओळखले जाते. 7 वर्षांच्या मगर वधूला सॅन पेड्रो हुआमेलुला येथून नेण्यात आले. यावेळी लोकांनी गाणी म्हणत संगीताचा आनंद घेतला.









