प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील अनेक कुटुंबांना महापूर नुकसान अनुदानास पात्र असतानाही अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तसेच कवठेगुलंद व शेडशाळ येथे महापूर काळात अपात्र लोकांना पात्र करुन शासनाच्या पैशांचा अपहार झाल्याची घटना चौकशीत उघड होऊनही संबंधितावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी आदेश व्हावेत, जबाबदार सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावे, या मागण्याप्रश्नी आंदोलन अंकुश या संस्थेच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषण सुरू झाले आहे
दरम्यान अंकुश संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या जयसिंगपूर निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना जयसिंगपूर दसरा चौकात रोखले, त्या ठिकाणी राज्यमंत्री यड्रावकर यांच्यावतीने त्यांचे बंधू व जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी निवेदन देण्यात आले.
त्यानंतर आंदोलन अंकुशाससह शेडशाळ व कवठेगुलंद ग्रामस्थांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे, निवेदनात म्हटले आहे की, कवठेगुलंद व शेडशाळमध्ये चुकीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना वसुलीच्या नोटीसा काढल्या असून पुढील कारवाई करुन शासनाचा बोजा मालमत्तेवर नोंद करावा. याप्रमाणेच अन्य गावातही समितीमार्फत चौकशी करावी, हा महाघोटाळा संगणमताने झाला असून तहसील कार्यालयातील संबंधितावर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ व आंदोलन अंकुश धरणाची रुंदी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली बैठकीत कोणता तोडगा न निघाल्याने धनाजी चुडमुगे यांनी आमरण उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला
Previous Articleटाकळी, मल्लेवाडी, बोलवाड ओढ्याच्या पुलांची उंची वाढवा
Next Article अब्दुल समद शेख यांना पुरस्कार









