राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांची माहिती, पंढरपूर, मोहोळ भागातील पाहणी करणार
सोलापूर / तरुण भारत संवांद प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात मागील तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला महापूर आले आहे. या पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज शनिवारी दुपारी अडीच वाजता सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.
अक्कलकोट पंढरपूर ,मोहोळ ,माढा, उत्तर सोलापूर या तालुक्यासह शहरातही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भीमा, सीना नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांनाही फटका बसला आहे. त्यामुळे पंढरपूरसह मोहोळ भागातील पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार सोलापूर दौर्यावर येत आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.









