अथणी तालुक्मयातील हुलगबाळ ग्रामस्थांचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
महापुरामुळे हिप्परगी येथील जलाशयामधून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे अथणी तालुक्मयातील हुलगबाळ गावाला मोठा फटका बसला होता. 250 कुटुंब असलेल्या या गावाचे स्थलांतर करण्यात आले. या पाण्यामुळे संपूर्ण घरे कोसळली होती. मात्र अजून आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई मिळाली नाही. तरी तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हुलगबाळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षी महापुरामुळे संपूर्ण जिह्यामध्ये हाहाकार माजला होता. हुलगबाळ गावामध्येही पाणी शिरले होते. या ठिकाणी 250 दलित कुटुंबे राहत आहेत. सरकारने तातडीने दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र एकाही कुटुंबाला दहा हजार रुपये मिळाले नाहीत. याचबरोबर आमचे पुनर्वसनही करण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही विविध समस्यांना तोंड देत आहे. तेंव्हा तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
महापूर आणि हिप्परगी जलाशयातील पाण्यामुळे अनेक घरे पूर्ण कोसळली आहेत. तर काही घरे अर्धवट कोसळली आहेत. त्यामधील कोणालाच नुकसान भरपाई दिली गेली नाही. तरी त्याचाही सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागराज कांबळे, संजू हादीमनी, विक्रांत कांबळे, नागाप्पा कांबळे, अण्णाप्पा डोईफोडे, आप्पासाहेब कांबळे, गणपती कांबळे, अशोक शिंगे, सुभाष कांबळे, दोड्डाप्पा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..









