कोल्हापूर / प्रतिनिधी
महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी विद्यादेवी पोळ यांची नियुक्ती झाली असून त्या गुरूवारी रूजूही झाल्या आहेत. 2010 मध्ये मुख्याधिकारी म्हणून शासकीय सेवेची सुरूवात करणाऱया पोळ यांनी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणूनही काम पाहिले. 2013 ते 2016 या काळात त्यांनी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेत, 2016 ते 2018 शिरूर नगरपरिषदेत, 2018 ते 2021 या काळात वाई नगरपरिषेदत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. उत्कृष्ट प्रशासकीय कामाबद्दल त्यांना 2015 ते 2018 या काळात तीनवेळा शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 2016 मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोळ यांना महानायक अभिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.