प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने बुधवारी म. वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महापालिकेच्या सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री गुंजेरी, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, सहाय्यक कार्यकारी अभियंते मंजुश्री एम., लेखाधिकारी बजंत्री, सहाय्यक कौन्सिल सेपेटरी एफ. बी. पिरजादे, सहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर तसेच संजय कांबळे आदींसह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.









