प्रतिनिधी / सांगली
महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक संजय मेंढे यांची वर्णी लागली आहे. सोमवारी सकाळी मेंढे यांनी पदभार स्विकारला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्ष नेता उत्तम साखळकर यांच्यासह कोंग्रेसचे बहुतांशी नगरसेवक उपस्थित होते.
विरोधी पक्ष नेता उत्तम साखळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी संजय मेंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र नगरसेवक मंगेश चव्हाण यांनीही या पदावर दावा केला होता. राज्यमंत्री विश्वजीत कदम, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांना साकडे घातले होते. बारा नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती.
काँग्रेस नेते मेंढे की चव्हाण पैकी कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मेंढे यांच्या गळ्यात विरोधी पक्ष नेते पदाची माळ पडली आहे. सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.
Previous Articleपुंछमधील चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद
Next Article महाराष्ट्र बंद : सांगलीत बंदला संमिश्र प्रतिसाद








