ऑनलाईन टीम / डर्बन :
आर्थिक फसवणूक प्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन कोर्टाने महात्मा गांधींच्या खापरपणतीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
आशिष लता रामगोबिन (56) असे गांधींच्या खापरपणतीचे नाव आहे. ती महात्मा गांधींच्या मुलाची मुलगी इला गांधी आणि मेवा रामगोविंद यांची मुलगी आहे.
आशिष लता यांच्यावर उद्योगपती एस.आर.महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप होता. भारतातून मालाची आयात करण्यासाठी आणि सीमा शुल्क म्हणून महाराज यांनी आशिष लताला 6.2 दशलक्ष रॅन्ड (3.32 कोटी) आगाऊ दिले होते. त्या मालाच्या विक्रीनंतर महाराज आशिष लता यांना नफ्यातील हिस्सा देणार होते. मात्र, या व्यवहारात आशिष लताने आपली फसवणूक केल्याचे महाराज यांनी म्हटले आहे.









