महाराष्ट्राची बदनामी करण्यातच भाजपाला आनंद : अंबानीला वाचविण्यासाठी सचिन वाझेची टेप वाजविली
प्रतिनिधी/सांगली
देशात वाढलेल्या महागाईवर राज्यातील भाजपाचे नेते मूग गिळून गप्प आहेत. बेळगाव येथे मराठी बांधवाच्यावर कन्नडिगांच्याकडून अन्याय होत चालला आहे. पण हे प्रश्न भाजपाला दिसून येत नाहीत. त्यांना फक्त अंबानीच आवडतो आणि त्याच्या रक्षणासाठी ते कायम पुढे येतात. भाजपाने आता हे बंद करून महागाई आणि सीमा प्रश्नावर बोलावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
सांगलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर झालेल्या या पत्रकार बैठकीमध्ये त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत, जयंत आसगावकर, विशाल पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील यांची होती.
नाना पटोले म्हणाले, बेळगावमध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्याने मराठी माणसांच्यावर अन्याय होत चालला आहे. कन्नडिगांच्याकडून जो धुडगूस घातला जात आहे. त्याबाबत राज्यातील भाजपाच्या एकाही नेत्याने चकारही शब्द काढला नाही. त्यामुळे भाजपाला सीमाप्रश्नाबाबत काहीच देणेघेणे नाही. सीमाभागातील मराठी बांधवाच्यावर अन्याय झाला की महाराष्टातील सर्वांनी एकजुटीने त्याचा विरोध करून कन्नडिगांना हिसका दाखविला पाहिजे. पण गेल्या काही दिवसापासून मराठी माणसांच्यावर अन्याय होत असताना राज्यातील भाजपाकडून याबाबत एक चकारही शब्द काढण्यात आला नाही. याचे कारण म्हणजे कर्नाटकात भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे त्यांना त्याला दुखवायचे नाही. सीमाप्रश्न सुटला पाहिजे यासाठी महाविकासआघाडीचे सरकार प्रयत्न करत आहे. पण भाजपा मात्र त्याला कोणतीही साथ देत नसल्याची टिका त्यांनी केली. मराठी माणसांच्यावर अन्याय झाल्यावर तरी राज्यातील सर्वांनी एक झाले पाहिजे.
नाना पटोले म्हणाले, अंबानीला घरावर हेलिकॉप्टर उडविण्याची परवानगी पाहिजे तसेच त्याच्या कुटुंबीयांना झेड सुरक्षा व्यवस्था पाहिजे. या दोन्ही गोष्टीला राज्यसरकारने विरोध केला आहे. शेतकरी आंदोलनाचा संपूर्ण रोष हा अंबानीवरच आहे. त्यामुळे या अंबानीला वाचविण्यासाठी भाजपाकडून सध्या आदळआपट सुरू आहे. त्यांच्या घरापासून एक किमीच्या अंतरावर ही गाडी सापडली त्या गाडीत कोणतीही स्फोटके नसल्याचे विरोधकांनीच सांगितले आहे. तरीसुध्दा त्यावर एवढा खळ करण्याचे काहीच कारण नव्हते. पण अंबानीच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी आणि त्याला वाचविण्यासाठी विरोधक धडपडत असल्याचा आरोप त्यांनी केला. सचीन वाजेची कोणतीही तपासणी किंवा कोणतीही माहिती घेण्यास एनआयएला कोणीही अडविले नाही. असेही त्यांनी सांगितले.
ceneieeF&Jej efJejesOekeÀ keÀener®e yeesuele veener
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले त्याबाबत काहीच कोणी बोलत नाही. त्याला आम्ही विरोध केल्यावर आम्हालाच ते सांगतात राज्यसरकारने कर कमी करा. पण, केंद्र सरकार डिझेलवर 18 रूपये रोड टॅक्स घेते आणि चार रूपये शेतकऱयांच्या विकासासाठी आकारत आहे. मग यातील काही रक्कम केंद्र सरकाराने कमी केल्यास सहजपणे इंधन दरवाढ निश्चित थांबू शकते पण त्यावर भाजपा काहीही बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधक आता राष्ट्रपती राजवटची भाषा बोलत आहेत
यापूर्वी राज्यात भाजपाचे सरकार दोन महिन्यात येणार म्हणून विरोधक बोलत होते. पण, गेल्या दोन महिन्यापासून त्यांनी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागली जाणार अशी भाषा वापरण्यास प्रारंभ केला आहे. भाजपाचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही कारण महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्ष टिकणार आहे. त्यामुळे राज्यात ना भाजपाचे सरकार येणार आहे ना राष्ट्रपती राजवट लागणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये बदल निश्चितच दिसून येईल
जिल्हÎात आणि राज्यात काँग्रेसची गटबाजी दिसून येत आहे. पण, येत्या काही दिवसांत ही गटबाजी पूर्णपणे कमी झालेली दिसून येईल. काँग्रेसचे नवीन चेहरे आता जनतेसमोर येत आहेत. येत्या काही दिवसांत काँग्रेसमध्ये बदल झालेला निश्चितच दिसून येईल. सर्वांना गटबाजी सोडून काँग्रेसच्या झेंडÎाखाली सर्वांनी एकत्रित यावे असे आवाहन आपण केले आहे. लवकरच याला सर्वांच्याकडून साथ मिळेल आणि काँग्रेस पक्षात बदल झालेला निश्चितच दिसून येईल असेही त्यांनी सांगितले.
33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये मोठा घोटाळा
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या घोटाळÎाबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्वपक्षीय आमदार आहेत. या समितीचा मीही एक सदस्य आहे. त्यामुळे लवकरच यामधील घोटाळा बाहेर येईल त्यावेळी भाजपाचा आणखीन एक नवीन चेहरा जनतेसमोर येईल असेही त्यांनी सांगितले.








