कसबा बीड / प्रतिनिधी
राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार मोदी सरकारच्या अनियंत्रित व अत्याधिक महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यासाठी खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासमवेत अमेठी येथून महागाई विरोधी देशव्यापी आंदोलन शनिवार 18 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आले. या आंदोलनाचा एक भाग कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये बीड शेड ते कसबा बीड पदयात्रा काढण्यात आली. आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रा संपन्न झाली.
या पदयात्रेची सकाळी 10.00 वाजता बीड शेड येथून कसबा बीड गावातील महादेव मंदिरापर्यंत जवळपास यावेळी सुमारे 5000 ते 6000 नागरिकांच्या उपस्थितीत ही पदयात्रा संपन्न झाली. महादेव मंदिर येथे सर्वांनी एकत्र येऊन सभा घेण्यात आली. यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक बाळासाहेब खाडे आदींची मनोगते झाली. बीड शेड ते कसबा बीड अडीच किलोमीटर अंतर ही पदयात्रा संपन्न झाली.
भाजप सरकारने काँग्रेसच्या काळातील ६० रू डिझेल दर असणारे आज भाजप काळात तेच दर 100 पार झाले आहेत, यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्याचबरोबर खत दरामध्ये वाढ,खाद्यतेलाचे दर ,घरगुती गॅसचे दर गगनाला भिडलेत .भाजप सरकारने त्यांच्या काल खंडात केलेली महागाई यामुळे सर्वसामान्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.बेरोजगाराची संख्या वाढत आहे. याविरोधात आवाज काढणा-यांच्या मागे ईडी चा ससेमिरा लावायचा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारकडून सातत्याने केला जात असल्याचे आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, करवीर पंचायत उपसभापती अविनाश पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, जि. सदस्य सुभाष सातपुते, चेतन पाटील, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष जी डी पाटील, कोगेचे बळीराम चव्हाण, आनंदा पाटील, महेतून सरपंच सज्जन पाटील ,एस डी जरग, बुद्धीराज पाटील, माजी उपसरपंच निवास पाटील, कसबा बीड सरपंच सर्जेराव तिबिले, शामराव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिबिले, रयत संघाचे संचालक सचिन विश्वासराव पाटील,करवीर विधानसभा मतदार संघातील सर्व संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण युवा पिढी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी व आभार गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व माजी सरपंच सत्यजित पाटील यांनी केले.