चार होडया जाळुन उध्वस्त केल्या
सावंतवाडी/प्रतिनिधी-
आरोंदा येथे महसुल विभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने अवैध वाळु उपसावर सोमवारी पहाटे केलेल्या कारवाईत चार होडया जाळुन उध्वस्त केल्या. यात अवैध वाळु उपसा करणारयांचे पंधरा लाखाहुन अधिक नुकसान झाले. गोवा येथील हे अवैध वाळु उपसाधारक होडीवाले आहेत. यात वीस कामगाराना ताब्यात घेउन सोडुन देण्यात आले. कारवाईच्यावेळी ते ग्रामस्थांच्या अंगावर धावुन आले. मात्र महसुल विभागाने त्याना न जुमानता कारवाई केली. सुमारे चाळीस होडीचालक महाराष्ट्राच्या हददीत येउन वाळु उपसा करतात. त्यामुळे किरणपाणी पुलाला धाेका आहे. चाळीस एकर जमिन वाळु उपशामुळे खचली आहे. वाळु उपसाधारक दादागिरी करतात. ते कुणालाही जुमानत नाहीत. त्यांच्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी होती. तहसिलदार राजाराम म्हात्रे, तलाठी पी. डी. पास्ते यांनी कारवाई केली.









