कला’मधील कल हा मूळ संस्कृत शब्द आहे. कल याचा अर्थ प्रकट करणे, आवाज करणे, एखाद्या पूर्ण भागातील काही अंश अविष्कारीत करणे इत्यादी. खूप गोंगाट झाला की आपण म्हणतो काय कलकल चालली आहे.
पूर्ण चंद्राच्या वाढत जाणाऱया आविष्काराला चंद्रकला म्हणतात. जसा चंद्र कला कलाने वाढतो त्याचप्रमाणे एखादे चित्र प्रथम बिंदु, रेषा, आकार, रंग, पोत याचा हळूहळू वापर होऊन यथावकाश पूर्ण होते. तसे शास्त्रीय संगीतातील एखादा रागामध्य्ाs हळूहळू आलाप, तान, बंदिश इत्यादी. आविष्काराने रागाचे स्वरुप उलगडताना दिसते.
ही कला एक जादुगारीण आहे. तिचा स्पर्श वस्तुला, विचारांना अगर भावनाना झाला की त्यांना चिरंतन रुप प्राप्त होते. मनुष्य्ाांच्या मनात अनेक भावना थैमान घालत असतात. या भावना उत्कट झाल्या म्हणजे त्यांना प्रत्यक्ष रुप देणे भाग असते. मग या भावना प्रत्येकाच्या आवडीनुसार मूर्त स्वरुपात येतात. कोण चित्र, शिल्प, गायन, वादन, कथा, कविता, नृत्य, अभिनय यातून मूर्त स्वरूपात आणतात.
कलेचा भोक्ता
सर्व प्रकारची कला म्हणजे आत्म्याचे प्रकटीकरण. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्वाचे अंग बनलेले आहे. जे जे सौंदर्य पूर्ण व कलात्मक तेथे मानव आकर्षिला जातो. मानवाची दृष्टाr जेव्हा कलेने किंवा सौंदर्याने भरून जाते जेव्हा तो कलेचा भोक्ता होतो. जसजसा मानवाचा सांस्कृतिक विकास होत गेला तसतशी ही कला अधिकच त्याच्या जीवनात ठामपणे दृढमूल झाली. जगात उदयास आलेल्या अनेक संस्कृतीकडे पाहिल्यास असे दिसून येईल की, कोणत्याही समाजामध्य्ाs मग तो सुशिक्षितांचा व अशिक्षितांचा असो, मागासलेला असो किंवा सुसंस्कृत वा पुढारलेला असो कला निर्मिती हे लोकजीवनाचे एक आवश्यक अंग बनले आहे. कलेचा विकास हा कोणत्याही शास्त्र्ााrय प्रगतीवर अवलंबून नाही. प्राचीन काळात इजिप्त, मेसोपोटेमिया, भारत, चीन, ग्रीस इत्यादी देशातील मानव प्रगत स्वरूपाचा नसतानाही कलाक्षेत्रात मात्र आश्चर्यकारक कामगिरी झाल्याचे आढळून येते.
शालेय स्तरावरील कलाशिक्षण आणि विशेषत: चित्रकलेचे शिक्षण हे एक विशिष्ट प्रकारचे शास्त्र्ा आहे. बालवयापासून मुलांच्या मनावर कलेचे संस्कार घडविणे म्हणजे खऱया अर्थाने चांगले सुसंस्कृत नागरिक बनविण्य्ााचा विचार करणे हा या शास्त्राचा मूलभूत आधार आहे. सामान्य नागरिकांच्या मते मुलांच्या पुढील आयुष्य्ाात ज्यांना डॉक्टर, इंजिनिअर, इत्यादी व्हायचे आहे, त्यांना या विषयाचा फारसा उपयोग नाही. हा गैरसमज आहे. खरी वस्तुस्थिती अशी आहे की चित्रकला हा विषय नसून ती एक शिस्त आहे. की ज्या मधून इतर विषयही योग्य प्रकारे शिकता येतात. ज्या विद्यार्थ्यास सुंदर लयबद्ध, गोष्टाr पाहून आनंद होतो त्याची संवेदनशक्ती सचेत होते व चांगल्या कलात्मक गोष्टाr स्वत: बनविण्य्ाास प्रवृत होतो, असा विद्यार्थी आपल्या आयुष्य्ाास सूत्रबद्ध आकार देतो. कोणत्याही क्षेत्रात तो कमी पडत नाही. त्याला जीवन कलारसिकतेने जगण्य्ााची सवय लागते. ज्यामुळे तो त्याच्या जीवनातील कठीण परिस्थितीतही त्याच्या मनाचा तोल जाऊ देत नाही.
जीवनाला क्रियाशीलतेचे वळण
लहानपणापासून कलेचे संस्कार मनावर घडल्यास व्यक्तिमत्त्वाला एक गहिरेपणा प्राप्त होतो. म्हणून शालेय जीवनात चित्रकलेचा अंतर्भाव असणे क्रमप्राप्तच ठरते. जगातील अनेक शिक्षणतज्ञांना त्याची प्रखरतेची जाणीव झाली आहे. वैफल्य, क्रौर्य, न्यूनगंड, असहाय्यता, अनेक प्रकारच्या मानसिक विकृती या आजच्या समाजातील प्रकर्षाने जाणवणाऱया प्रवृत्ती नाहीशा करावयाच्या असतील तर जीवनाला क्रियाशीलतेचे वळण लावणे आवश्यक आहे. हे वळण लावण्य्ाासाठी साधा सरळ मार्ग म्हणजे मुलांना सुंदर गोष्टाrत रमण्य्ााची संधी देणे. अशी संधी कलेद्वारे सहज शक्य होते. या पार्श्वभूमीवर विचार करता, शाळेत चित्रकला शिक्षणाचे महत्व आहे. याची कल्पना येईल.
लहान मुलांना रंगाबद्दल कुतुहल असतेच रंगाबरोबर आकाराची जाण, आकलन वाढविणे या दृष्टाrचा विकास करणे. आकाराचे ज्ञान देत असताना पोताची जाण त्या अनुषंगाने स्पर्शज्ञान वाढविणे, स्पर्श, गंध, स्वाद, श्रवण, दर्शन याद्वारे सौंदर्याचा आस्वाद घेण्य्ााची प्रवृत्ती निर्माण करणे, विकसित करणे त्यासाठी योग्य संधी देणे.
कलाशिक्षणाचे उद्दिष्ट
परमेश्वराने प्रत्येक व्यक्तिमध्य्ाs कलेचा अंश ठेवलेला आहे. त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. परंतू तो अंश आपल्यात आहे. हे ओळखण्य्ााचे व त्याच्या अविष्काराचा प्रयत्न करणे म्हणजे कलेची उपासना करणे. कोणत्याही ऐहिक सुखापेक्षा कलेतून मिळणारा आनंद निश्चित उच्च प्रतीचा असतो.
कला शिक्षणाचा मूळ हेतू मनाला वळण लावणे नसून संपूर्ण जीवनाला नीट वळण लावणे, लहान मुलाच्या मनात दडून बसलेल्या भाव भावना, सुप्त निर्माणक्षम शक्ती यांना वाव देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे, हे शालेय कलाशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे मानावेच लागेल.









