एकास अटक, एक फरारी
वारणानगर / प्रतिनिधी
मसूद माले, ता. पन्हाळा, येथील जय हनुमान केंद्रीय अनु – जाती निवासी आश्रम शाळेतील रिक्त झालेल्या अधिक्षकपदाची नोकरी देण्याचे अमीष दाखलून तीन लाख रू. ची फसवणुक केल्या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात दि. २ जानेवारी रोजी संस्थेच्या प्रशासकासह त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक प्रकरणी प्रकरणी हनुमान केंद्रीय अनु – जाती निवासी शाळेचे प्रशासक गौतम पांडुरंग इनामदार व त्याचा साथीदार हणमंत उर्फ हेमंत आण्णासो वाघमारे रा. म्हाडा कॉलनी,आर.के. नगर कोल्हापूर यांच्यावर फिर्यादी पालक व त्याच्या मुलास भूलथापा देवून, शाळा अनुदानीत आहे. असे सांगून अधिक्षकपद रिक्त आहे. त्या जागेवर नेमणूक करण्यासाठी तीन लाख रू. घेतले होते गुन्हा दाखल झाले पासून हे दोघेही फरार झाले होते.
संस्थापक प्रशासक गौतम पांडुरंग इनामदार हा अद्याप फरार आहे. तर त्याचा साथीदार हणमंत उर्फ हेमंत वाघमारे यास राहत्या घरातून पोलिसानी तीन दिवसांपूर्वी अटक करून त्याचे चार चाकी वहानही जप्त केले आहे. त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळून न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. याचे विरोधात अशाच स्वरूपाच्या अनेक तक्रारी दाखल असून ते वाद उच्च न्यायालयात आहेत. या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, हावलदार नामदेव सुतार करीत आहेत.
Previous Articleआटपाडीलगत विवाहितेचा गळा चिरला, दीड तासात आरोपी जेरबंद
Next Article सांगली जिल्ह्यात 728 कोरोनामुक्त, नवे 615 रूग्ण









