साहित्य : टॉपिंगसाठीः दीड चमचा तेल, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेली भाजी (कोबी, फ्लावर, गाजर, बीन्स), 1 बटाटा वाफवून मॅश केलेला, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा लिंबूरस, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, इतरः 4 गव्हाचे ब्रेड स्लाईस, 4 चमचे बटर, 4 चमचे चीज, टोमॅटो केचप
कृती : गरम तेलात कांदा आणि आलं-लसूण पेस्ट टाकून मिनिटभर परतवावे. नंतर त्यात मिक्स भाज्या टाकून मध्यम आचेवर दोन मिनिटे परतवून घ्याव्यात. आता त्यात बटाटा, लाल तिखट पावडर, लिंबूरस, कोथिंबीर आणि मीठ टाकून मिश्रण मिनिटभर परतवून टॉपिंगसाठी मिश्रण तयार करावे. आता या मिश्रणाचे चार भाग करावेत. बेड स्लाईस घेऊन त्यावर बटर पसरवावे. नंतर त्यावर तयार टॉपिंगचे मिश्रण पसरवावे. त्यावर चीज पसरवावे. तयार टोस्ट ओव्हनमध्ये 200 डिग्री तपमानावर पंधरा मिनिटे ठेवून बेक करावेत. आता तयार मसाला चीज टोस्ट टोमॅटो केचपसोबत खाण्यास द्या.









