संकेश्वर : येथील निजलिंगेश्वर शिक्षण संस्थेच्यावतीने 31 रोजी सकाळी 11 वा. मल्हारगौडा पाटील यांचा पहिला स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या समारंभाला निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने चेअरमन राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, यमकनमर्डीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. जी. वाघी, कोल्हापूरचे व्याख्याते सुरेंद्र हेरवाडे हे उपस्थित राहणार आहेत. तर संकेश्वर नगरपरिषदेच्या अध्यक्षा सीमा हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, हुक्केरी ग्रामीण विद्युत संघाचे अध्यक्ष कलगौडा पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.









