वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा मल्ल रविंद्रकुमार उत्तेजक चांचणीत दोषी ठरल्याने नाडाने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. रविंद्रकुमारने विश्व कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.
गेल्यावर्षी झालेल्या 23 वर्षाखाली वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेत रविंद्रकुमारने रौप्यपदक मिळविले होते. गेल्यावर्षी विश्व कुस्ती स्पर्धेत रविंद्र दाहियाने रौप्यपदक पटकाविले होते पण नाडाकडून त्याची उत्तेजक चांचणी घेण्यात आली नाही. या स्पर्धेवेळी नजरचुकीने रविंद्रकुमारने रौप्यपदक मिळविल्याची घोषणा करण्यात आली होती पण त्यानंतर गोंधळ निर्माण झाल्याने रविंद्रकुमारने या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले नसल्याचा खुलासा करण्यात आला. गेल्यावर्षीच्या 14 मे रोजी रविंद्रकुमारवर नाडाने हंगामी स्वरूपाची निलंबनाची कारवाई केली होती. उत्तेजक चांचणीत त्याच्या मूंत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याचे नाडाकडून सांगण्यात आले.









