कोची
मल्याळम सिनेमाचे गीतकार बिच्छू तिरुमला यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्मयाने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते वृद्धापकालीन आजारांशी झुंज देत होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 3,000 चित्रपटगीते आणि 2,000 भक्तिगीते लिहिली. त्यांच्या पश्चात पत्नी परसाना आणि मुलगा सुमन असा परिवार आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तिरुमला यांचा जन्म 13 फेबुवारी 1942 रोजी सस्थमंगलम येथे झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी बी. शिवशंकरन नायर असे त्यांचे नाव ठेवले होते. मात्र, गायन क्षेत्रात त्यांची बिच्छू तिरुमला या नावानेच ओळख निर्माण झाली होती. त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीत ए. आर. रेहमान, आणि एम. एस. बाबूराज आदी दिग्गजांसोबत काम केले होते.









