नवी दिल्ली
भारतामध्ये मागील दोन महिन्यापासून डियाजिओ, एअरटेल, पेप्सिको, कोका कोला आणि आदिदास यासारख्या कंपन्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरात देण्याचे बंद केले आहे. यासोबतच सदर प्लॅटफॉर्मवर कंपन्यांची जाहिरात दिसण्याचे बंद झाले आहे. यातून सदर कंपन्यांनी फेसबुक व इस्टाग्रामला अनप्रेंड केल्याचे संकेत निर्माण होत आहेत.
1 जुलैपासून आम्ही संपूर्ण जगातील सर्वात मोठय़ा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देण्यात येणारी जाहिरात थांबवली असल्याची माहिती डियाजिओ इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. तसेच सोशल मीडिया संदर्भात बोलावयाचे असल्यास वादग्रस्त आशयसोबत अन्य पोस्ट केल्या जात असल्याचेही म्हटले आहे. तसेच यामध्ये कोरोना कालावधीचाही मोठा प्रभाव राहिल्याने हा निर्णय घेतला असल्याचे अन्य कंपन्यांनी म्हटले आहे.









