ऑनलाईन टीम / क्वालालंपूर :
मलेशियाने पाकिस्तानला जबरदस्त धक्का दिला आहे. मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्वालालंपूर विमानतळावर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) बोईंग-777 विमान जप्त केले. स्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर हे विमान जप्त करण्यात आले आहे. राजनैतिक माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे विमान कंपनीने शुक्रवारी सांगितले.
पाकिस्तान एअरलाइन्सने 2015 मध्ये व्हिएतनामच्या कंपनीकडून दोन विमाने भाडेकरारावर घेतली होती. त्यामधील एक विमान मलेशियातील स्थानिक न्यायालयाने जप्त केले आहे. यूकेकोर्टात प्रलंबित असलेला पीआयए आणि आणखी एक पक्ष यांच्यातील कायदेशीर वादातून मलेशिया न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.









