वृत्त संस्था/ कौलालंपूर
भारताचा स्क्वॅशपटू सौरभ घोसाळने येथे शनिवारी झालेल्या मलेशियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेचे जेतेपद पटकाविताना टॉप सीडेड मिगेल रॉड्रिग्जचा पराभव केला. पीएसए टूरवरील घोशालचे हे दुसरे विजेतेपद आहे.
स्क्वॅशपटूंच्या मानांकनात 15 व्या स्थानावरील भारताच्या सौरभ घोसाळने अंतिम लढतीत मिगेल रॉड्रीग्जचा 55 मिनिटांच्या कालावधीत 11-7, 11-8, 13-11 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सौरभ घोसाळने यापूर्वी म्हणजे 2018 साली पीएसए टूरवरील पहिले जेतेपद मिळविले होते.









