मुंबई प्रतिनिधी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याने त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजप दडपशाही करत आहे. त्यासाठी आज सकाळी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार व पदाधिकारी केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने करत आहेत. तर शुक्रवारी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष मिळून जिल्हा पातळीवर या दडपशाहीविरोधात मोर्चे काढणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Previous Articleमोबाईल चोरीप्रकरणी विजापूरच्या वृद्धाला अटक
Next Article हर्षच्या मारेकऱयांवर कारवाई करा









