ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना राणावत यांनी केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशाराही राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला.
कंगनाच्या या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या, असे म्हटले आहे. तसेच कंगना म्हणाली होती, हिमाचल सरकारने किंवा केंद्र सरकारने मला सुरक्षा द्यावी. मुंबई पोलीस नको, प्लीज..
जर हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती राहत असेल आणि ती जर असे म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. अशा वेळी मी म्हणेल की जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको. तुम्ही तिथं राहता, खाता, तिथं कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे.
जर मी या राज्यात राहतो, तर माझा अधिकार आहे, पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा. जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाहीये. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी, असेही राऊत म्हणाले होते.